VIDEO सैफ अली खान म्हणतो, मी पद्मश्री पुरस्कार परत करणार होतो, कारण…

0
12

VIDEO सैफ अली खान म्हणतो, मी पद्मश्री पुरस्कार परत करणार होतो, कारण...

मुंबई, 14 मे : बॉलिवूडचा अभिनेता आणि आता निर्माता झालेला अरबाज खान सध्या ‘पिंच’ नावाचा ऑनलाईन टॉक शो करत आहे. या शो मध्ये गेस्ट म्हणून आलेला अभिनेता सैफ अली खान आपल्याला मिळालेला पद्मश्री सन्मान परत करणार असल्याचं म्हणाला.

पिंच या शोमध्ये सेलेब्रिटी स्वतःवर झालेल्या ट्रोल्सविषयी चर्चा करतात. सोशल मीडियावरच्या टीकेला उत्तरं देतात. अरबाज खानच्या या शोमध्ये नुकताच सैफ अली खान सहभागी झाला होता. सोशल मीडियावर सैफच्या नावाने ट्रोलिंग सुरू होतं, त्याविषयी बोलताना सैफने पुरस्कार वापसीबद्दल सांगितलं. या कलाकाराने पद्मश्री पुरस्कार विकत घेतल्याची टीका एका ट्रोलनं सोशल मीडियावर केल्यानंतर वैतागलेल्या सैफने हा पुरस्कार परत देण्याचा विचार केला होता. “बॉलिवूडमध्ये पद्मश्री पुरस्कारासाठी माझ्यापेक्षा जास्त लायकीचे अनेक कलाकार आहेत. पण असेही लोक आहेत, जे माझ्यापेक्षा कमी लायकीचे असून पुरस्काराचे मानकरी आहेत”, असं सैफ म्हणाला. सैफनं नेमकं काय सांगितलंय हे खालच्या व्हिडिओत दिसेल.

अरबाज खानने या शोमध्ये सैफला त्याच्यावर होणाऱ्या टीकेविषयी विचारलं. सैफ- करिनाचा मुलगा तैमूरची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होते. त्यावरून ट्रोलही केलं जातं. त्याविषयीही सैफने मोकळेपणाने चर्चा केली. तैमूरच्या नावावरून केली गेलेली टीका नाहक होती, असं तो म्हणाला. तैमूरचा अर्थ लोह असा आहे. म्हणजे पोलादासारखा मजबूत, या अर्थासाठी मुलाचं नाव तैमूर ठेवल्याचं तो म्हणाला.

First Published: May 14, 2019 07:25 PM IST

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here